STORYMIRROR

Sunita Padwal

Classics

4  

Sunita Padwal

Classics

हरपले सप्तसूर

हरपले सप्तसूर

1 min
236

सूर भूपाळी ऐकून

प्रभा सकळजणांची

सार मोहक सुंदर

चाल मधुर गीतांची.....१


दिव्यत्वाची कन्या ज्योत

भारताची उंच मान

अखंडित गीतगाण

लय संगीताचे ज्ञान.... . २


अवघेंची विश्व वेडे

ताली मंत्रमुग्ध बुडे

अवचित असे घडे

सूर आठवणीत दडे..... ३


हरपले सप्तसूर

काळ नेई हिरावून

युगे युगे उरणार

गुंज सुरेल स्मरून..... ४


आनंदले स्वर्गवास

लताईंचा सहवास

गेले दूर स्वरश्वास

नाही बसत विश्वास..... ५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics