उपासमारी
उपासमारी
आधीच आमचे काही
बरे दिवस नव्हते...
त्यातच ह्या संकटाने
सगळेच हिरावून घेतले होते...
दोन वेळचे पोट
आम्ही कसेबसे भरत होतो..
एखादा दिवस पाण्यानेच
पोट भरत होतो..
नशिबाची खेळी
अशी काही फिरली...
पुन्हा एकदा आमच्यावर
उपासमारीची वेळ आली...
तुमच्यातला देव
होईल तशी मदत आम्हाला करतो...
पण आमच्यातला
भुकेचा एकतरी बळी जातो...
सगळे मिळून आता
त्या विषाणूला हरवतायत...
पण उपासमारी पुन्हा एकदा जिंकतेय
हे कदाचित विसरताहेत...
