STORYMIRROR

Meenal Margaj

Others

4  

Meenal Margaj

Others

बालपण

बालपण

1 min
375

हरवले बालपण माझे शोधून कोणी देईल का???

अपेक्षांचं ओझ बाजूला सारून

पुन्हा आईच्या कुशीत 

निजता मला येईल का???


सकाळ होते रोजच

पण जबाबदारीच्या विचाराने

पुन्हा थोड बेजबाबदार होवून

लहान होता येईल का???

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का???


प्रवास असतो रोजचाच

धावपळीचा अन् सरळ रस्त्याचा

पुन्हा थोडा रस्ता चुकवून

मागे वळता येईल का???

पुन्हा त्या रस्त्यावर

जुन्या आठवणी भेटतील का??

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का???


वरिष्टाचांच्या बोलण्यापेक्षा

आई पुन्हा ओरडेल का???

बाळा अभ्यास कर

म्हणून धपाटा एक देईल का???

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का???


लहानपणी खेळताना

मोठे होण्याचे नाटक केले

आता मोठे होवून

लहानपण अनुभवता येईल का???

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का???



Rate this content
Log in