आयुष्य 'ती'चे
आयुष्य 'ती'चे
1 min
456
निभावुनी वेगवेगळ्या भूमिका
आयुष्याच्या रंगमंच्यावरच्या
घराला ती घरपण देते...
विसरुनी भान स्वतःचे
अस्तित्व ती सगळ्यांचे जपते..
लेकराची माय होते
ऑफिसात मॅम होते...
सासरची सून होते
माहेरची ती लेक होते...
दुसऱ्यांची होवून
ती स्वतः चे अस्तित्व विसरते..
बाळाचे भरण्या पोट
स्वतःची ती भूक विसरते...
वादळात ही ती
खंबीर उभी राहते...
अन् शिकुनी नवे तंत्रज्ञान
सुखी संसाराचा गाडा चालवते...
नसते कधी कौतुक
तिच्या आईपणाचे...
अन् तिने कधी ना
गायले धडे "मी"पणाचे..
शब्द ही नतमस्तक जाहलें
लिहिता गोडवे
"ती" च्या आयुष्याचे...
