चाकरमानी
चाकरमानी
1 min
217
चार पैसे कमवाक म्हणून
गावाकडलो माणूस शहराकडे धावता..
आणि घड्याळातल्या काट्याच्या
मागान पळान मगे दमता...
कोंब्याच्या आवाजान होणारी सकाळ
आता अलार्मवर होता...
न्याहरीक आता म्हणे त्याका
ब्रेड-बटर खावूक मिळता...
अनवाणी चालण्याची मजा
आता मॉर्निंग वॉकमध्ये शोधता...
जात्यावरल्या दळणाची मजा
म्हणे झुंबा क्लासमध्ये गावता...
अंगणाची ओढ म्हणून
छोट्याश्या गॅलरीत सुखावता...
ओसरीवरच्या गजालीचो आनंद
व्हॉट्सअॅप ग्रुपवर शोधाक बघता...
शहराकडे म्हणे
पैसे दिल्यावर सगळा मिळता...
पण मनाची शांतता मिळवूक
चाकरमान्याक गावाकडेच येवुक लागता...
