सरकार
सरकार


अरे सरकार सरकार
कधी डोळे उघडून पाह,
दरवर्षीचे गाऱ्हाणं संसार, संसार पाण्यात वाही.
गरिबाच जीवन झालय बेजार,
येतील चांगले दिवस कळ सोसतच राही.
अरे सरकार सरकार
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखून दाव.
बेरोजगाऱ्यांना,प्रत्येक हातास दे काम.
भष्ष्ट्राचाऱ्यांचे माजलय रान,ते उखडूनच दाव.
कायद्याचे हात करा लवकरच ते भक्कम.
अरे सरकार सरकार
न्यायाचे दाद मिळते, पंधरा, वीस वर्षे जरी,
नकोशी,बलात्काऱ्यांचे जगावे की मरावे.
महागाई मुळे घर मिळेनाही त्यास
चोर हा सावकार, सामान्य जनतेनच मरावे.
अरे सरकार सरकार
प्रत्येक उदभवनाऱ्या समस्याचे,
राखून मान उत्तर रोख ठोक दे ठेवून.
शत्रू देशाला करून गार,दिसू दे कर्तृत्व छान.
लहान थोर हे गावू दे तुझेच गान.
अरे सरकार सरकार
अब्दुल कलाम, राजेन्द्र प्रसाद येवू दे.
स्वच्छ निर्मळ,नेत्यांचे कारभार होऊ दे.
साऱ्या राष्ट्रात भारत होऊ दे महान.
सार्वभौम देशाचा आम्हा सदैव अभिमान.