जगणं माझं एक दिवसाचं
जगणं माझं एक दिवसाचं
जगणं माझं एक दिवसाचं
तू पण एकदा जगून बघ ना
मी वेडी मी खुळी अन भिकारी ही
पण एकदा तू मिठीत घेऊन बघ ना
अस्सल नगरी मी पण
पुरती संपलेली तुझ्या श्वासात
तुझ्या प्रत्येक शब्दात अन
तू दिलेल्या प्रत्येक दुःखात
तू अन् मी एक नाण्याच्या
दोन अखंडित बाजू
प्रेमाच्या बाबतीत मात्र
तू अन मी मोजमापाचा तराजू
तु निघून गेल्याच पत्र
पाखरू घेऊन आलं
दुभंगलेल्या नात्यात आपल्या
विरहाच्या झळा लागून ते ही मेलं
कोणाला सहन होणार रे
असला तात्पुरता लळा
प्रेमाची दोर सैल सोडली
अन कापला गेला गळा
बस्स आता पुरेसं झालं
मरणाचे दार आता उघडले
सरणाची सजवासजव झाली
तुझ्यामुळेच हे विपरीत घडले
