प्रश्न आहे तुझा माझा
प्रश्न आहे तुझा माझा


प्रश्न आहे तुझा माझा
नको कानाडोळा करू
साथ सुटणार नाही
हाती हात घट्ट धरू
प्रश्न आहे भविष्याचा
नको रमू भूतकाळी
तुझ्या नावाचं ते कुंकू
लेवू वाटे मला भाळी
होऊ दोघे एकरूप
नको दोघांत अंतर
देऊ घेऊ प्रेम दोघे
सुखी होऊ निरंतर
प्रेम केले जर खरे
नको मानू आता हार
राजीखुशी तुझी माझी
घालू गळा प्रेम हार
प्रश्न तुझा माझा होता
प्रण होता तुझा माझा
चल थाटात संसार
उभा करू तुझा माझा