काळीज चिरून जाऊ नकोस
काळीज चिरून जाऊ नकोस
जीवनात येऊन अशी
फिरून जाऊ नकोस
निर्दयतेने काळीज माझं
चिरून जाऊ नकोस ||0||
धडधड तूझ्या नावाने
दिवसरात्र करतं हे
केवळ एक तुझ्यावर
सखे मात्र मरतं हे
आठवणीतून अशी
विरून जाऊ नकोस
निर्दयतेने काळीज माझं
चिरून जाऊ नकोस ||1||
धक्का तुटण्याचा हा
आघात करून जाईल
जिवनाची दोरी तुटेल
अन गुदमरून जाईल
विरहात अशी सखे
जिरून जाऊ नकोस
निर्दयतेने काळीज माझं
चिरून जाऊ नकोस ||2||
लाथाडताना हृदय हे
थोडातरी विचार कर
विचार तूझ्या हृदयाला
आणि मग प्रहार कर
वाकड्यात अशी तू
शिरून जाऊ नकोस
निर्दयतेने काळीज माझं
चिरून जाऊ नकोस ||3||
हृदय आहे हृदय गं
खूप नाजूक असतं गं
मेणासारखा वितळणारं
तूप साजूक असतं गं
क्रूरतेने हृदय असं
पिळून जाऊ नकोस
निर्दयतेने काळीज माझं
चिरून जाऊ नकोस ||4||
