STORYMIRROR

Raakesh More

Tragedy

3  

Raakesh More

Tragedy

नव्हती मला सुखाची भूक

नव्हती मला सुखाची भूक

1 min
11.7K

सुरुवात होती जगण्याची 

तुला बघवलं नाही सुख 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||0||


ठरवलं होतं असंच एकटा 

आयुष्य जगणार आहे मी

उदासीनपणे साक्षीभावाने 

आयुष्य बघणार आहे मी 

दिलंस वाट्याला भरभरून 

संपणार नाही असं दुःख 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||1||


असंच रडत कढत पुन्हा 

तोच पाढा गिरवत जाणं 

आशेच्या प्रत्येक वाटेवरून 

स्वतःला मागे फिरवत जाणं 

शब्द विरहात विरून गेले 

भावनाही मग झाल्या मूक 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||2||


पूजा करतात मनोभावे 

निर्मिक म्हणतात सर्व तुला 

तरीही का वागतोस असा 

कशाचा तुला इतका गर्व 

दूर आज ती माझ्यापासून 

मिळत नाही एकही लूक 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||3||


कुठेही ती असो सुखी 

दुःख तिची मागतो मी 

दुनियेच्या नजरेत आता 

वेड्यासारखा वागतो मी 

कळत नाही अजून मला 

काय झाली माझी चूक 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||4||


तडफड तडफड करत

असंच आयुष्य जगत जाणं 

वेडावतात ही सुखं मला 

त्यांना हसून बघत जाणं 

प्रेमवेडं काळीज असतं 

जगात सर्वाहून नाजूक 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||5||


संवेदनशील मन हे वेडं 

अजून स्वप्न कुरवाळतं 

अजून तिच हवी याला 

अजून तिच्यावर भाळतं 

प्रेम करता करता वेडं 

झालं कमालीचं भावुक 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||6||


का कुणास ठाऊक तुला 

आठवण माझी येईल का 

उध्वस्त झालेल्या माझ्या 

विश्वामध्ये नेईल का 

तेज गळालं जीवनातलं 

चित्र दिसे सारं अंधुक 

आणलंस तिला आयुष्यात 

नव्हती मला सुखाची भूक ||7||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy