तगमग
तगमग
दुःख आहे आम्हास। नाही व्यक्त करता येत ।। जरा रहावे सांभाळून।।१।।
आम्ही नाही शिलेदार । तरी लडतो आहोत सर्व ।। युद्धाचा असेल निर्णय काय ?।। हे बाकी माहीत नाही अजून।।२।।
आम्हाला नाही पहायचा अंत। नाही थांबवायचे जगणे ।। तरी तू दे आम्हा धडे आपुलकीचे।।३।।
या मरणाच्या प्रवासात ।हरायचे नाही स्वताशीच ।।त्यास रहा तू सदैव आमच्या आत।।४।।
सोडून तू जावू नको सख्या। भाऊ म्हणे तुझ्यासाठीच जगतो आहे मी ।। तुची माझा श्वास अन् आमचा आत्माही तू...।।५।।
