काहीतरी राहिलंय
काहीतरी राहिलंय
काहीतरी राहिलंय
काहीतरी विसरलंय
पण काय तेच समजत नाही
दिवस सरतोय
रात्र ढळतेय
अंधार पसततोय
पण अजूनही दिवेलावण मात्र झाली नाही
असा का होतेय ते मात्र समजत नाही
हातात काहीच नाही
पण हातातून सुटत मात्र जातंय
तरीसुद्धा सुटलेलं मात्र मिळत नाही याची खंत अजून आहे
असं का होतंय हेच समजत नाही
तारूण्य सरलंय
म्हातरपण समोर दिसतंय
पायाला चाक
मनाला बाक
आयुष्य सरतंय
मन दुखतंय
काळीज करपतय
असं का होतंय समजत नाही
आपलेच सारे
आपल्यालाच पोरके
असं का हेही समजत नाही
काहीतरी राहिलंय
काय राहिलंय
कुठं राहिलंय
हे मात्र अजूनही समजत नाही
