देव अडकला देव्हार्यात
देव अडकला देव्हार्यात
आली आली हो महामारी नाही तिची हो संगत भारी
किती अगाध तिचा महिमा नाही तिला कोणती सीमा
आमचे हात बांधले यानेे घातले कुुंपण आमच्या दारी
देेेव ही आडकला देव्हार्यात चार भिंतीत त्याची स्वारी
बंंदिस्त झाल्या सार्या नजरा खोळंबून गेले सारे हात
औषधाविना सुरू झाली लढाईला सुुरुवात
काळजी घेेऊन करा मुुकाबला करूया मिळून सारे मात
घरात राहून संंकटाशी सारे करूयात चार हात
लक्षात ठेवा पाळा नियम हे दिवस ही सरतील
आपले देवही माणसांसारखे पालखी मधून फिरतील
