STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy

3  

Raakesh More

Romance Tragedy

तूझ्या प्रीतीचं जग

तूझ्या प्रीतीचं जग

1 min
11.8K

आज तुला सखे मला  

डोळे भरून बघायचं आहे 

तुझ्या प्रीतीचं जग सखे 

क्षणभर तरी जगायचं आहे ||0||


उद्या तुझ्या अवती भवती 

आठवणीच राहतील बघ 

सारं काही मिळेल तुला 

सुनं वाटेल सारं जग 

खोटं असलं तरी क्षणभर 

प्रेम तुझं मागायचं आहे 

तुझ्या प्रीतीचं जग सखे 

क्षणभर तरी जगायचं आहे ||1||


काय सांगू किती किती 

स्वप्न रंगली होती मनी 

तुझ्या नकाराने पुन्हा 

स्वप्न भंगली होती मनी 

असफल प्रेम असलं तरी 

जिंकल्यासारखं वागायचं आहे 

तुझ्या प्रीतीचं जग सखे 

क्षणभर तरी जगायचं आहे ||2||


कधीतरी कोणी माझं 

नाव नक्की घेईल बघ 

निर्मिकही तो तुला माझ्या 

आठवणीत नेईल बघ 

प्रेम इतकं स्वस्त नसतं 

हेच तुला सांगायचं आहे 

तुझ्या प्रीतीचं जग सखे 

क्षणभर तरी जगायचं आहे ||3||


आज तुला प्रेम माझं 

समजत नाही मान्य आहे 

आज तुझ्या नजरेत मी 

एक व्यक्ती सामान्य आहे 

बघ एक दिवस तुला 

स्वप्नात माझ्या रंगायचं आहे 

तुझ्या प्रीतीचं जग सखे 

क्षणभर तरी जगायचं आहे ||4||


सत्य आजचं आज मी 

हसत स्वीकारणार गं 

तरीसुद्धा एक सांगतो 

नाही मी हरणार गं 

जरी आज या क्षणी 

प्रेम माझं भंगायचं आहे 

तुझ्या प्रीतीचं जग सखे 

क्षणभर तरी जगायचं आहे ||5||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance