STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

संथ वाहते कृष्णामाई

संथ वाहते कृष्णामाई

1 min
12K

न्यायदेवता उभी आंधळी

बांधून पट्टी डोळ्यावरती

तराजूत त्या पुण्य पडे वा

होऊ दे पापाची भरती


वरुनी दबाव टाकती मंत्री

विकले गेले किती वकील

कितीदा वाढवून दिल्या तारखा

फेटाळले कितीदा अपील


किती एक त्या दिशा, निर्भया

तुडवल्या गेल्या पायाखाली

मूक आक्रोश कित्येकांचा

नाहीच त्यांना कोणी वाली


विकती घरदार आपुले आपुले

न्यायासाठी होती कंगाल

देऊनी तारखा वरी तारखा

वकील मात्र मालामाल


आंधळी ती न्यायदेवता

तिला कशाची खंत नाही

काळ धावतो पुढे पुढे पण

संथ वाहते कृष्णामाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy