STORYMIRROR

Raakesh More

Tragedy

3  

Raakesh More

Tragedy

काहीच नसतं गं क्रोधात

काहीच नसतं गं क्रोधात

1 min
11.7K

कधीतरी तू येशील बघ 

नक्कीच माझ्या शोधात 

कळेल तुला त्या दिवशी 

काहीच नसतं गं क्रोधात ||0||


काहीतरी राग डोक्यात 

उगाच भरला होतास 

ठरला होता बघ तूच 

काळ सखे गोतास 

ताकद अफाट आहे गं 

प्रेमाच्या या बोधात 

कळेल तुला त्या दिवशी 

काहीच नसतं गं क्रोधात ||1||


प्रेम शिकवणं त्या वेळी

शक्य नव्हतं तुला 

म्हणून तुला जपत होतो 

माझ्या कोमल फुला 

सारं प्रेम माझं झालं 

व्यर्थ तूझ्या अवरोधात 

कळेल तुला त्या दिवशी 

काहीच नसतं गं क्रोधात ||2||


दूर झालो तुझ्यापासून 

तुला मिळवण्यासाठी 

अशा सहजच सुटत नाहीत 

प्रेमाच्या या गाठी 

प्रेमाच्या वृक्षाची ताकद 

मनाच्या बळकट खोडात 

कळेल तुला त्या दिवशी 

काहीच नसतं गं क्रोधात ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy