STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

3  

Sakharam Aachrekar

Others

हे गीत माझे नाही

हे गीत माझे नाही

1 min
184

शब्द होते मनी परंतु, नव्हते ओठी सूर

होती वेड्या मना या, तुझी फक्त हुरहूर

गीत कविता वाटेल तुला हे, अथवा अजून काही

कवी असेन मी या रचनेचा, पण हे गीत माझे नाही


शोधिले मी प्रश्न जेव्हा, तुझ्या पापण्यांत झुकलेल्या

उमगली मज उत्तरे तयांची, आसवांत तुझ्या सुकलेल्या

मांडले असतील मी शब्दांत माझ्या, तुझे भाव काही

कवी असेन मी या रचनेचा, पण हे गीत माझे नाही


आसवांची किंमत माझ्या, तू का सागराशी केली

सोडून मजला एकांती अशी का, दूरदेशी तू गेली

उमटले हे बोल मनीचे, हृदयातून मम काही

कवी असेन मी या रचनेचा, पण हे गीत माझे नाही


रंगीत हे जग तुझ्यावाचूनी, रंगहीन झाले

तुझ्याविना हे व्यर्थ जिणे का, माझ्यानशिबी आले

माफ कर ना एकदा मला जर, माझे चुकले असेल काही

कवी असेन मी या रचनेचा, पण हे गीत माझे नाही


Rate this content
Log in