बोलत नाही ती कधीच
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच
होते फक्त नजरेनेच सारे
तिला त्याची भाषा कळते
त्याला तिचे भाव कळतात
गालातल्या गालात हसत
एकमेकांचे विचार कळतात...
तिची तळमळ डोळ्यात दिसते
त्याचे प्रेम पापण्यात वसते
नजरेची जुगलबंदी घडता
दोघांचे डोळे किलकिले असतात
तिचं दुःख डोळ्यातून पाझरतं
त्याच्या वेदना हृदयात झरतात
एकमेकांशी न बोलता ही
मिठीत आसवे हट्टाने रडतात

