STORYMIRROR

Ashwin Chavhan

Romance Tragedy

2  

Ashwin Chavhan

Romance Tragedy

एकांत

एकांत

1 min
15.4K


माझा एकांत आणि मी

असतो जिवन मरणाच्या

फेऱ्यात ....

केव्हा पुस्तकात गुरफटलेला

तर कधी वहीत विखुरलेला


आज ते हसणं त्या कट्ट्यावरील

गप्पा सारं सारंच नामशेष होत आहे

जसं माझं अस्तित्व ...

या ढासळणाऱ्या इमारतीला

गिलावे देतो मौन राखून पण सार गौण


जर रस्त्याने जाताना एखाद्या यौवनाच्या

बुरूजावरून नजरेनं नजर कडेलोट होते

तेव्हा संशय चारीत्र्यावर अन् पुरूषत्वावर..


विचार येतो जगण्याचं ओझं सारून

तरुणपणा उपभोगायला हवा होता

पण मी जगण्याचे रहस्य विस्कटत बसलो


बालपण आणि तरुणपण त्यागून

साध्य काहीच झालं नाही

वाट्याला आला तो अंधार

जो उपभोगतोय एकांतात ..


पण या अंधारात राहून दिव्य ज्ञान

प्राप्त होईल का होणार नाहीचं

कारण मला अजून आयुष्य जगायचं आहे

त्या उधाणलेल्या प्रवाहासारखे

हंगामी का होईना पण माझ्या धुंदीत ....


त्या प्रवाहाचा गुणधर्म कदाचित

मी अंगिकारू शकणार नाही

त्या दगडापरी मी तटस्थ आहे ...

त्यावर समाजाने इज्जतीचा

शेंदुर लावलेला


मला ती झुळूक व्हायची आहे

जी कृत्रिम शेंदुराच्या ठिकऱ्या

ठिकऱ्या करून एखाद्या

युवतीच्या ओठास स्पर्शून जाईल


पण कधी काळी नको असलेला

एकांत आज हवा हवासा वाटतोय

नाही वास्तविक पण

जसं वाटेल तसं जीवन जगायला ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance