संकल्प
संकल्प
सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही
उजाडली एक जानेवारीचि सकाळ
कालपर्यंतचि जळमट झटकून
पांघरली नवीन किरणांची वाकाळ
सगळे करतात म्हणुन
मी सुद्धा केलेत अनेक संकल्प
सफळ नाही झालेच कधीही
कालमर्यादा होती अगदीच अल्प
लठ्ठपणा टाळण्यासाठी ठरवल
थांबवायचे जिभेचे गोड हट्ट
वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत
दिवसात पंधरा तिळगूळ केले मट्ट
कपाट उघडताच कोसळू लागल्या
कपड्यांच्या घड्यावर घड्या
कपडे न घेण्याचा निर्धार करुनही
महिन्यात घरात आल्या चार साड्या
कुरकुरनार्या गुढघ्याच्या समस्येसाठि
सकाळी चालण्याचा शोधला उपाय
गुलाबी थंडीच्या अधीन झाल्यावर
बिचारा अलार्म करेल तरी काय??
आपसातील सुसंवाद होण्या सुरू
मीच मोबाईलला लपविले कुठेतरी
सहु शकले नाही फार काळ त्याची दुरि
Private agency ला बोलवावे लागले घरी
सगळेच संकल्प आले मोडकळीला
ह्या वर्षी डोक्यात वेगळीच कल्पना
नको उपदेश, नको वाद
करायच्या नाहीत उगीच वल्गना
कितीही झाली जबरदस्ती तरीही
घट्ट मिटायचे आपले ओठ
मनात मोजायचे शंभर अंक
हाताची घडी तोंडावर बोट
सुखद जीवना चा सुंदर मंत्र,
जपून ठेवलाय काळजाच्या कोपर्यात
पुरा होवू दे माझा हा संकल्प
प्रार्थना करा मनातल्या मनात
