माझी शाळा
माझी शाळा
गिरणगावातील कामगारांच्या मुलांसाठी
शिरोडकर ही एकमेव शाळा
जिच्या खत पाण्यावरच फुललाय
हा सुंदर फळाफुलांचा मळा
आईच्या कडेवरून उतरताच
शिशुविकासची चढले मी पायरी
विजयाताईंनी हात धरून,
शिकवला 'श्री गणेशा' पाटीवरी
'हा हिंद देश माझा' प्रार्थनेने
सुरू व्हायचा दिवस शाळेचा
सरस्वती वंदनाने सुरू होत असे
पहिला तास वर्गाचा
विभूतीपूजनाने झाल्या
स्वातंत्र्यवीरांच्या सनावली पाठ
नरेपार्क मधील राहुटीने शिकलो
कसा सजवायचा नवीन फ्लॅट
गीता-गीताई पठणाने
शब्दोच्चार झाले एकदम स्पष्ट
ऑफ पिरियड ला सांगितलेली
आजही आठवते 'श्यामच्या आई'ची गोष्ट
विद्यार्थीदिनामुळे वाढला होता
शिकवण्याचा आत्मविश्वास
कुमार कला च्या स्पर्धातुन विजयी होण्याचा
एकच असे आमचा ध्यास
सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी
एच डी सरांकडून मिळायची दीक्षा
त्यामुळेच उत्तीर्ण झालो
जीवनसंग्रामातिल प्रत्येक परीक्षा
विद्यार्थी सभेच्या निवडीनंतर
हॉलमध्ये होत असे शपथविधी
आठवताना मात्र कीव येते
पाहून आजची राजकारणनीती
कवायत, नृत्य, संगीतामुळे
झाला आमचा सर्वांगीण 'विकास'
अग्रणी होतो प्रत्येक क्षेत्रात
कधीच नाही झालो नापास
सलाम माझा 'त्या' शाळेला
आजी माजी सर्व शिक्षकांना
असेच घडू दे देशसेवक उद्याचे
हीच आहे ईश्वरचरणी प्रार्थना
