STORYMIRROR

Shubhada Bhangle

Inspirational Others

4  

Shubhada Bhangle

Inspirational Others

माय मराठी

माय मराठी

1 min
379

राज दरबारी धूळ माखल्या पाटीवरती

 कुणीतरी मारिली हळूच फुंकर

मलीन झटकत उभी राहिली

 देत एक सुखद हुंकार


कडाडली ती बिजलीवाणी

 मीच साऱ्या भाषांची राणी

हवी कशाला परकी माजोरी

 मीच मराठी सुंदर वाणी


बोल बोबडे साद घालती

 मराठीतूनी मातेला आई

ऐकत तिची गोड अंगाई

 कुशीत मायेच्या झोपी जाई


सर्वप्रथम गिरविला ओमकार

 दिला मनाला सुज्ञ आकार

नवी दिशा अन नवा सुविचार

 हेच माय मराठीचे संस्कार


कबूल करतो एक आम्ही

 एकदाच चुकलो आमच्या आयुष्यात

परदेशाच्या आकर्षणाने

 शिकवलं मुलांना इंग्रजी शाळांत


आकाशा घालण्या गवसणी

 पक्षी उडून गेले दूरवर

थकलेली मने वाट पाहतात

 वृद्धाश्रमाच्या जीर्ण पायर्यांवर


'मऱ्हाटी' शब्दांत आहे हट्ट

 नात्यांची वीण बनवतो घट्ट

कष्टांच्या मर्यादाना नाही हद्द

 लढण्या मराठीशक्ती नेहमीच सिध्द


मराठीला आहे मातीचा वास

 मराठीत आहे अभिमानाचा श्वास

मराठीने घडविला छत्रपतींचा इतिहास

 मराठीच करेल परकीयांचा ऱ्हास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational