फक्त तूझी आस ❤️
फक्त तूझी आस ❤️
प्रथम दर्शीनी तुझ्या प्रेमात पडले मी..
मधाळ तपकिरी बोलक्या डोळ्यात हरवून गेले मी..
असे वाटे भेटीचा तो क्षण पून्हा यावा आयुष्यात..
का कोण जाणे तूला गमावण्याची भिती सदैव मनात..
मनाला हुरहुर लागे की तू माझा होशील ना..
तुझ्याशिवाय काही केल्या मला मूळीच करमेना..
तू गच्च चांदण्याने भरलेली सोबतीला चंद्राची रात..
तू तिमिरात उजळणारी प्रकाशाची पणती आणि मी वात.
शब्द तूझे गोड साखरेप्रमाणे ज्यात मी विरघळते..
अंगणी चांदण्यात मी फिरता तूझीच आठवण छळते..
आपल्या अनपेक्षित भेटीसाठी नेहमी आतुरलेली मी..
प्रेमाच्या वर्तुळात थोडी बांधील व थोडी सावरलेली मी..
साद दे एकदा भरेन तुझ्या स्वप्नात मी रंग..
ओवाळून टाकेन जीव होऊ न देणार अपेक्षाभंग..
तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या कवितेच्या मी प्रेमात..
एक दिवस होईल आपली भेट याच मी भ्रमात..
तूला एक क्षण पाहण्यासाठी कसे सावरू स्वताला..
तुझ्या हृदयाच्या तुरूंगात कायमचे कैद व्हायचे मला..
लाजते गुलाबाच्या नाजूक कळीप्रमाणे घेता तू कवेत..
भेटता जेव्हा तू पाहते स्वताला तुझ्या नजरेत..
माझ्या नजरेने तुझ्या हृदयाचा वेध घेत असते मी..
तूझे पाणीदार नयन जणू काही माझ्या मनाचा आरसा..
तूला दिसेल का माझ्या डोळ्यात तूज्यावरचे निस्वार्थ प्रेम?
तूझे हृदयच या मुक्या पाखरूचा खोपा आणि आसरा..

