खरच काळ बदलला बाई
खरच काळ बदलला बाई
खरच पहिल्या सारखं नाही राहिले काही
आता सर्वांनाच असते घाई
खरच काळ बदलला बाई...
पहिले होते प्रेम परिवारात
आता प्रेम राहिले दोघात
खरच काळ बदलला बाई...
पहिली कष्टाची कामे होती पण होता वेळ
आता झाले सोयीचे पण नाही राहिला वेळ
खरच काळ बदलला बाई...
आधी एकमेकांसाठी जीव द्यायचे
आता एकमेकांचा जीव घ्यायचे
खरच काळ बदलला बाई...
आधी आई बाबांनाच देव मानत
आता आई बाबांना सोडून आश्रमात
देव शोधतात देवळात
खरच काळ बदलला बाई...
पहिली होती भाऊ बांधिलकी
आता भाऊ झाला वैरी
खरच काळ बदलला बाई...
पहिली होती गरिबी
पण मनाची श्रीमंती खुप भारी
आता झाली परिस्थिती बरी
पण मनाने झाले गरीब
खरच काळ बदलला बाई...
कस म्हणतात झाला विकास
सर्वच झालाय भकास..
खरच काळ बदलला बाई...
माणुसकी उरली नाही काही....
