बा भिमा परतुनी या संविधान
बा भिमा परतुनी या संविधान

1 min

177
बा भिमा परतुनी या तुम्ही
होणाऱ्या अत्याचारावर घालण्या आळा
सर्वानी संविधानिक मुल्ये
मनातून पाळा
बा भिमा परतुनी या तुम्ही
जाती व्यवस्थेवर घालण्या घाव
राजकारणी पोळी भाजून
मांडला सगळा डाव
बा भिमा परतुनी या तुम्ही
पेरलेल्या माणूसकी चा होतोय अंत
तुम्ही दिलेले अधिकार हिरावतात
हिच मनामध्ये निर्माण होते खंत
बा भिमा परतुनी या तुम्ही
करण्यासाठी चळवळ बळकट
स्वार्थासाठी कार्यकर्ता
बनत आहे मळखट