संसार
संसार


असंख्य यातना सहन करून
हाकला संसाराचा गाडा तुम्ही
हे कधीच विसरणार नाही
बहीण भाऊ आम्ही
संसार म्हटले तर
भांड्याला लागते भांडे
आई बाबा तुम्ही आमच्या साठी
जीवनाचे तुमच्या खांडे
संसार करण्यासाठी तारेवरची
कसरत करावी लागते
काही कारणास्तव बायको
संशयास्पद वागते
संसारासाठी करावे लागते
मेहनत काबाड कष्ट
कधी होतील जीवनातील
दुःख सारी नष्ट