STORYMIRROR

Surykant Kamble

Others

3  

Surykant Kamble

Others

भारतीय संविधान

भारतीय संविधान

1 min
402

क्रांतिकारकांचे देशासाठी

आहे अनमोल योगदान

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी

दिले आम्हाला महान संविधान 

भारतीय संविधानाचे पाईक आम्ही

स्वाभिमानाने घडवू धर्मनिरपेक्ष राष्ट्र

स्वच्छंद पुरोगामी विचारांनी

करू देशातील विकृत माणसिकता नष्ट

कोहिनूर आहेत भारताचा डॉ बाबासाहेब

आंबेडकर हाच आहे आमचा स्वाभिमान

जगामध्ये विश्वरत्न म्हणून गाजते त्यांचे नाव

भारतीय संविधान हाच आहे आपला अभिमान

उध्दार करूया देशाचा सोबत या सर्वांनी

नका करू जाती धर्माचे राजकारण

संविधानाच्या विचारांनी होऊ प्रेरीत सारे

पेराल तेच उगवेल करा समाजकारण

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा

प्रसार संविधानाच्या माध्यमातून करू आम्ही

जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून

राजकारणाची पोळी भाजून घेऊ नका तुम्ही   ‌


Rate this content
Log in