भारतीय संविधान
भारतीय संविधान


क्रांतिकारकांचे देशासाठी
आहे अनमोल योगदान
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी
दिले आम्हाला महान संविधान
भारतीय संविधानाचे पाईक आम्ही
स्वाभिमानाने घडवू धर्मनिरपेक्ष राष्ट्र
स्वच्छंद पुरोगामी विचारांनी
करू देशातील विकृत मानसिकता नष्ट
कोहिनूर आहेत भारताचा डॉ बाबासाहेब
आंबेडकर हाच आहे आमचा स्वाभिमान
जगामध्ये विश्वरत्न म्हणून गाजते त्यांचे नाव
भारतीय संविधान हाच आहे आपला अभिमान
उध्दार करूया देशाचा सोबत या सर्वांनी
नका करू जाती धर्माचे राजकारण
संविधानाच्या विचारांनी होऊ प्रेरीत सारे
पेराल तेच उगवेल करा समाजकारण
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा
प्रसार संविधानाच्या माध्यमातून करू आम्ही
जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून
राजकारणाची पोळी भाजून घेऊ नका तुम्ही