मनुस्मृती
मनुस्मृती


25 डिसेंबर 1927 रोजी ग्रंथ प्रेमी
बाबासाहेबांनी केले मनुस्मृती चे दहन
संविधान आल्या पासून
तेच होत नाही मनुवाद्याना सहनं
बाबासाहेबानी मनुस्मृती ला
रायगड येथे जाळले
संविधानाच्या अगोदर
मनुवाद्यांनी खूप छळले
मनुस्मृतीत होता
माणसा माणसात भेद
नव्हती परवानगी
वाचायला & ऐकायला वेद
मनुस्मृती प्रमाणे स्त्रियांना
सती जावे लागायचे
स्त्रियां & शुद्रांशी
मनुवादी क्रुर वागायचे.
मनुस्मृतीत पेरली
होती विषमता
बाबासाहेबांनी मिळवून
दिली सर्वांना समता