STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

विठूराया

विठूराया

1 min
13.9K


तुज मागतो मी आता, दान दे रे विठूराया

थोडी उसंत मिळावी, मला तुझे गुण गाया


दिसरात राब-राब कधी होईना सुटका

किती लावावी ठिगळं, माझा संसार फाटका


रोज दळीता कांडिता, दिस सरतो रे सारा

किती आवरला तरी, रोज वाढतो पसारा


काय करावे कळेना, शांती मनाला मिळेना

केली हाडाची मी काडं, भाग्य तरी उजळेना


धाव-धाव विठूराया, अरे अनाथांच्या नाथा

तुझ्या चरणी मी देवा, नमवितो रे हा माथा


Rate this content
Log in