आरसा
आरसा
1 min
11.1K
जरी माझ्याशी खेटला आरसा
तरीही मी पुढे रेटला आरसा
भेटले तसे तर लाखो-करोडो
तुझ्यासम मला न भेटला आरसा
तुला जमले नाही सत्य पचवायला
का बरे असा तू फेकला आरसा ?
दुष्ट, अधम, पापी समाजाने ठरवले
अन् हातामध्ये मी घेतला आरसा
अन्याय-अत्याचाराने होऊन संतप्त
जेव्हा पाहिले मी पेटला आरसा
तुझे बिंब जेव्हापासून उमटले
जीवापाड जपून मी ठेवला आरसा