खरे 'स्वरुप'
खरे 'स्वरुप'
बघून जगरहाटी मी सैरभैर जाहलो
खरे 'स्व'रूप शोधण्यास धाव-धाव धावलो
खंतावलो, पस्तावलो,धास्तावलो, भांबावलो
लक्षात येत नव्हते मी का तुला दुरावलो?
मारेकरी होते उभे प्रत्येक वळणावरती
माझे मला कळेना मी कसा बचावलो
घेतली लावून सारी दारे जगाने जेव्हा
तुझ्या कुशीत, मी खुशीत, येऊनी विसावलो
हाल जाहले किती याला सुमार नाही
हासूनी तू पाहिले अन मी भरून पावलो