STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

4  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

बाजार वाढले

बाजार वाढले

1 min
487


दुनियेत या हजारो आजार वाढले

डॉक्टरांचे सोबतच ‘बाजार’ वाढले


लोप पावली मूळची ‘सेवाभावना’

चोर लुटारूंचे सरदार वाढले


अवयवांचे सारे आहेत ‘स्पेशालिस्ट’

अगणित तयांचे ‘कारभार’ वाढले


‘फाइव्ह स्टार’ झाले सारेच हॉस्पिटल्स

‘दर’पत्रकं तयांचे बेसुमार वाढले


‘टेस्ट’ हजारो ‘निल’ निकालाच्या

मशिनरींमुळे ‘चोचले’ बेकार वाढले


सा-याच ‘दुकानांचे’ आहेत साटेलोटे

'गळे कापण्याचे’ विचार वाढले


‘मेडिक्लेम’ची सुविधा वापरायला हवी

या हव्यासाने ‘पेशंट्स’ फार वाढले


साहित्याला गुण द्या
लॉग इन