व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
नडला की तोडला , कुणी रडवला
कुणी बडवला तुमी नादच केला पुरा
गावावर जणू भूतानं नांगर फिरवला
व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
हौस तुमी पुरवली ,साऱ्यांचिंच जिरवली
गॉड बोलून तर कधी पैशात तोलून
सुखाची हिरवळ ,गढी नेस्तनाबूत केली
व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
घरा - घरात , नाक्यावर तुमचा चेला
पूर्वी मोळी विकू पण शाळा शिकू म्हणायचे
आता किडनी विकू पण मत मात्र शेठलाच
व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
मायावी खोटी -खोटी स्वप्ने दाखवली
विरोधक संपवली , लाचार बनवली
अंधभक्तांची फौजच उभी केली
व्वा शेठ !... खरंच तुमी हाय ग्रेट
फोडा आणि झोडा खेळ तुमचा जुना
दुश्मनाना फितूर ,सत्तेसाठी आतुर
मीच देव ,मलाच म्हणा तारणहार