पहाट व स्त्री भ्रूणहत्या
पहाट व स्त्री भ्रूणहत्या
स्त्री भ्रूणहत्या
करू नका रे
तीच्यविना ना
जीव नसे रे
पित्याची लाडी
मुलगी शान
कर्तृत्व करी
कार्य महान
अबला नसे
अशक्त जरी
बुध्दीने जग
जिंकते सारी
पित्याची परी
असे गोजिरी
वयात येता
होते लाजरी
तिच्या सोबत
संसार सुखी
नाते जपूनी
न करी दुःखी
जाते सासरी
जोडून नाती
लावते घरी
प्रेमाच्या वाती
पहाट
लेवूनी मंद गारवा
उगवे शीतल पहाट
सांगे कानात जणू
नवस्वप्नांची वाट
किलबिलाट पाखरांचा
उल्हासित करी मना
टवटवी ताज्या फुलांची
बहर नवा देई जीवना
कोवळे सोनेरी किरण
पडता पहाट दवबिंदूवरी
वाटे मोती लेवून सजलीय
अवघी हिरवी धरा सारी
वाटे पाहाण्या सप्तरंगी पहाट
जन्म घ्यावा पुन्हा पुन्हा या धरी
मंगलमय पहाट ही रोवी
उत्साहाचा तुरा दिवसाच्या शिरी
ध्येयासम अढळ भासे
नभिचा तो शुक्रतारा
अंगास झोंबे
पहाटे चा मंद मंद वारा
