Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Santosh Zond

Tragedy Inspirational

3  

Santosh Zond

Tragedy Inspirational

आपण का जगतो?

आपण का जगतो?

1 min
550

भूक असणार्‍या पोटासाठी की उद्या नसणाऱ्या नोटासाठी! 

जगण्या मरण्याची स्पर्धा असणार्‍या जगात कुणाला तरी हरवण्यासाठी

की स्वतःच वेगळं असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी! 

आज असणार्‍या लोकांसाठी की चाके नसणाऱ्या झोक्यासाठी! 

अंगा खांद्यावर खेळणार्‍या निशब्द देवासाठी की पोटात असतांना पदराची सावली देणाऱ्या आईसाठी! 

जगणं शिकवणाऱ्या मित्रांच्या मदतीसाठी की हसणं शिकवणाऱ्या त्यांच्या सोबतीसाठी !

स्वर्ग भासणारा निसर्ग पाहण्यासाठी की नरक बनवणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी!!

आपण जगतो स्वतःसाठी की आनंद वाढवणाऱ्या आपल्यासाठी! 

निकामी स्वार्थ साधण्यासाठी की कौतुकी शब्द ऐकण्यासाठी !

प्रत्येकाने जगावं त्या दिवसा साठी डोळ्यात येणार्‍या आनंदअश्रूंसाठी!

झटाव जगात वेगळी ओळख बनवणाऱ्या त्या स्वप्नांसाठी!!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy