दिवाळी
दिवाळी
1 min
185
दिवाळी
का सगळ्यांसाठी सारखी नसते
स्वतःची सावलीच तिथं स्वतःसाठी पारखी असते
नसला दिवा काहींच्या दारे
तिथं असतात की चंद्र तारे
असतो कितीतरी जणांचा
तो धुर करुन निसर्गाला मारण्याचा छंद
कुठे भेटतो सगळ्यांना तो
नव्या खरेदीचा आनंद
स्वप्न असते चिमुकल्या डोळ्यांचे
पाय आपसूकच चार चाकी जवळ जातात
मन मोडुन तेव्हा बाबांची
सायकलच मोठी सवारी होते
पण विसरु नको एक दिवस पावलांची होते वाट
नक्कीच उगवते पेटलेल्या स्वप्नांची पहाट
तेव्हा मिळेल तुला सगळं काही
फक्त नाराज होऊन बसायचं नाही
