हाहाःकार पावसाचा...
हाहाःकार पावसाचा...
दरवर्षी जाणवतो
हाहाःकार पावसाचा
माणसाला छळतो हा
दुष्ट कोप निसर्गाचा....!
सरसर अंगावर
कोसळती जलधारा
कधीतरी करतात
गोल गारपिटी मारा...!
अति जलवृष्टी होते
तेव्हा महापूर येतो
सारा संसार वाहून
कफल्लक गाव होतो..!
असा वेदनादायक
हाहाःकार पावसाचा
जातो गळूनही सारा
अहंकार मानवाचा..!
