मी व माझी झोळी
मी व माझी झोळी


मी व माझी झोळी
दोघांचं खूप वर्षापासूनचं नातं आहे.
सात जन्मी तूच राहो
असं तीचं व्रत आहे
अठरा विश्वे हिंडून तिनं
पत्रा लोखंड गोळा केली
इतभ पोटाची
तिनंच खळगी भरली
कधी उकिरड़यावरतीच रात असायची
अंधा-या रातीला तीचीच साथ असायची
तीचं माझं नातं कधीच तुटणार नाही
गेलो जरी सरणावरती
माझ्यावाचून मरणार नाही