हे सूर्यदेवा
हे सूर्यदेवा


हे सूर्यदेवा
मन हे आनंदून जाते
तुझ्या रोजच्या उदयाने
सृष्टी ही फुलुनी जाते
तुझ्या नित्य आगमनाने
देह हा थकून जातो
रोजच्याच भाकरीसाठी
तुला पाहूनी वाटे
भरारी घ्यावी जीवनाने
येणे रोजचे तरीही
पुन्ह
ा वाटे नव्याने
सारेच शांत होई
तुझ्याच मावळण्याने
नाही दिसलास जरी तू
काळ्या त्या नभाने
भेदून टाकतोस त्यांना
तुझ्या लक्ष किरणांने
किलबिल ही पाखरांची
होते तुझ्या चाहूलीने
फिरूनी घरटयात येती
तुझ्याच नित्य अस्ताने
निर्माण झाली ही धरणी
तुझ्याच एक तुकड्याने
जीव हा टिकून आहे
केवळ तुझ्याच अस्तित्वाने
मिळे ऊर्जा ही जगाला
तुझ्याच लख्ख जळण्याने
नमन शब्दांतून हे सारे
तुजला श्रीकृपेच्या मनाने