मी एक शिक्षक
मी एक शिक्षक

1 min

286
मी एक शिक्षक
इथं आहेत निराकार दगड
आणि फक्त मातीचे गोळे
द्यायचे आहेत त्याना आकार
घडवायच्या आहेत राम बुद्धाच्या मूर्ती
कोरायचे आहेत त्यांच्यावर सुसंस्कार
तेच आहेत देशाचे आधार
मी एक शिक्षक
पेरायची आहेत मला बीजे
या जमिनीत
जेथून जन्मतील उद्याच वटवृक्ष <
Advertisement
/strong>
जे देतील प्रत्येक वाटसरुला
सुखशांती व प्रेमाची सावली
मी एक शिक्षक
फुलवायच्या आहेत मला बागा
जिथे फुलतील फुलेच फुले
जे पसरवतील दाही दिशात
किर्तीचा सुगंध
मी एक शिक्षक
आहे माझे एक वचन
देशासाठी सदैव करेन
सच्ची पिढी निर्माण