पोळा
पोळा


यंदा अंगणातूनच
तुमचा सत्कार
आणि जयजयकार
होणार आहे
तेव्हा रागवू नका
आणि सांभाळून घ्या
वेळ कठीणाईची
लायकी नाही आमची
कि मागावी माफी
तुमच्याजवळ कारण
आमचीच करणी
भोवली तुम्हाला
आणि बर्बाद झाला
दिवस तुमचा
विकासाच्या नावावर
अट्टहास करत
उध्वस्त केली धरणी
खाल्ले जीव जंतू
आणि फेडतोय पापं
आता आपल्याच
डोळ्यांदेखत
भोगू द्या करणी
आमचीच आम्हाला
आणि करून घ्या
सहन तुम्हीही थोडं
कारण पर्याय नाही
आमच्याजवळ
तुमच्या सणासाठी