ग्रहण : विचारांस लागलेला अभिशाप
ग्रहण : विचारांस लागलेला अभिशाप
माहितेय विचारांस
ग्रहण केव्हा लागतं?
जेव्हा,
डोकं आणि मन यांच्यामध्ये
नकारात्मक विचार एकरेषेत उभे ठाकतात...
आणि अशाच विचारातून होते
निर्मिती एका विकृतीची!
विकृती जी ८ महिन्यांच्या बाळावर
करते अत्याचार,
तर कधी जन्माला येण्याआधीच
'त्या' कळीवर होतो चाकूचा भडिमार...
विकृती जिथे महिषीच्या पोटी रेडा आला तर विकला
जातो
आणि
मातेच्या उदरी मुलगी असेल तर आयुष्यभर तिचा जीव
मात्र चिरडला जातो...
तर कधी जातो मनुष्य अंधश्रद्धेच्या आहारी...
मग विकृतीचा नंगा नाच
मात्र पाहते दुनिया सारी...
विकृती महाबलाढ्य आजारावर अफवा पसरवण्याची...
विकृती मानवाने मानवाला नष्ट करण्याची...
विकृती जी करते मुक्या प्राण्यांचा खात्मा...
अहो प्राणी काय? भूतलावर सुखात नाही उदरातील आत्मा...
विकृती जी अभिजात घटनांना लावते धार...
विकृती जी वंचितांचा मात्र हिसकावून घेते आधार...
अशाच विकृतींना एकत्र साधून घडतो प्रत्येक गुन्हा...
आणि आपण मात्र म्हणत राहतो,
इतिहासच पुनरावृत्त होतो पुन्हा...
सांगा मला कोणी,
विचारांस लागलेलं हे ग्रहण कधी संपणार?
पुनश्च भूतलावर सकारात्मकतेचा डंका कधी वाजणार?