Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Somnath Ekhande

Tragedy


4.0  

Somnath Ekhande

Tragedy


नाव उताऱ्यावरलं...

नाव उताऱ्यावरलं...

1 min 476 1 min 476

उद्या मेल्यावर तुला ,

कुठं पुरतील पोरं ?...

नाव उताऱ्यावरुन ,

करु नको गड्या कोरं....//धृ//


सांभाळीली वाढविली

दावणीची वसुधनं...

झाली बरकत घरा

गाई-गुरांच्या येण्यानं

बांध शिवारावाचून

कुठं चरतील ढोरं//१//


नाही आज उद्या तरी

कीव ढगांना येईल....

आले थेंब परतोनी

माती पोटात घेईल

मग कुठं धरशील

तुझी मोट आणि दोर..//२//


आज मातीस विकून

नको होऊस बेरकी

तिला बाजारा मांडून

का रे करीतो परकी

तुझ्यावर या काळीचे

आहे उपकार थोर...//३//


माय यशोदा विकून

बांधशील राजवाडा

किती दिवस चालेल 

तुझ्या संसाराचा गाडा ?

लेकरांच्या नशिबाचा

का रे बनतोस चोर ?//४//

नाव उताऱ्यावरुन ,

करु नको गड्या कोरं....


Rate this content
Log in

More marathi poem from Somnath Ekhande

Similar marathi poem from Tragedy