STORYMIRROR

Somnath Ekhande

Romance Others

2  

Somnath Ekhande

Romance Others

मला तुझ्या प्रेमाच्या,जगात राहू दे

मला तुझ्या प्रेमाच्या,जगात राहू दे

1 min
62

तुझाच मी तू माझी, भ्रमात राहू दे

मला तुझ्या प्रेमाच्या, जगात राहू दे


नकोस आणू 'नाही', तू ओठावरती

नकार माझ्यासाठी, मनात राहू दे


प्रेम उडावे इतके, हलके तर नाही

नको पाखडू त्याला, सुपात राहू दे


विष पाजते मला गं, तू का नजरेने?

एकटीच झुरणारी, जमात राहू दे


रांगड भेजा भाऊ, दांडगा गं तुझा

नको पाठवू त्याला, घरात राहू दे


नांद सुखाने विसरू, नकोस तू मजला

करार बघ हा माझ्या, तुझ्यात राहू दे


नको मुकर्रर तिजला, म्हणूस तू राणी

एक गझल तू माझी, दिलात राहू दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance