विसावा
विसावा

1 min

434
कष्ट करताना थांबायला वेळ नाही चालू आहे रात्रं-दिवसा,
अजून ओळख नाही त्या शब्दाची ज्याचं नाव आहे विसावा,
फुकट मिळण्याची कधीच मनामध्ये बाळगली नाही आशा,
दिवस सांगतो कधी तरी भेटेल विसावा तुझा चालू ठेव तमाशा
कष्टाची कधी मनी धरली नाही लाज,
तुझी फक्त साथ हवी एवढंच सांगायचंय आज
माझ्यावरच का कोपलास,
श्रीमंतांच्या घरामध्ये तू न बोलवता गेलास
तू ही आमची पिळवणूक करून घेतोस का त्या व्यापाऱ्याप्रमाणे?,
तुझ्या नावाचा तिरस्कार वाटू लागला आहे धानाच्या भावाप्रमाणे
शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं,
शेतकऱ्याचा कोण नाही वाली हे विसाव्यानं पण दाखवलं