पैसा
पैसा
पैशानं वेढलंय
नुसतं मानवाला
माणुसकीपेक्षा किंमत
आली पैशाला
माणूस विसरला
सवंगडी, आप्त
कसा होईल
पैसा प्राप्त
पैशामुळे वाढला
नुसताच हव्यास
संस्कारांचा झाला
सगळा ऱ्हास
पैसाच ठरवतो
सुखाची व्याख्या
गिळंकृत केले
जगाला आख्ख्या
पैशामुळे होऊ
लागले गट
गुपचूप रचले
गेले कट
वरकमाई वाढू
लागली आपोआप
नीतिमत्ता बदलली
वाढले पाप
कधी बदलणार
हे चित्र
सारेच कसे
वाटे विचित्र