साऊ
साऊ
शिक्षणाची ज्योत साऊ
तू पेटवलीस समाजात
नाहीतर चूल मुलं एवढंच
गोंदल असतं स्त्रियांच्या नशिबात
तू किती सोसलस माय
दगड गोटे अन किती अपमान
तू सूर्य झालीस
केलस आमचं जीवन प्रकाशमान
तू लढलिस इथंल्या कर्मठ
सनातन्याशी
तू केली नाहीस पर्वा
ऊन पावसाची
जोतिबांच्या खांद्याला खांदा लावूंन
तू इथल्या रूढी परंपरा पायदळी तुडवल्या
समतेचे धडे दिलेत लाखो मुक्ता घडवल्या
