फक्त एका अफवेवर
फक्त एका अफवेवर
पहावत नाही नयनांना
रक्ताच्या चिळकांड्या उडताना ...
ह्रदयाला जाणवतात वेदना
जर पाहिली माणसं
रक्ताच्या धारोळयां त पडताना ...
आता तर वाटू लागते भीती
माणसांची च माणसांना
की उठेल एखादी अफवा ..
नि दगडाने ठेचली जातील माणसं फक्त एका अफवेवर .......
का कुणास ठावुक
वाटू लागत भय एकाकी
विनाकारण चिरडली जातात
माणसासारखी माणसं ...
चालवली जाते कुऱ्हाड ,
कोयता , नि तलवार.
ठेचल जात दगडाने ,
घातल्या जातात काठ्या सर्वांगावर ..
नि मारली जातात माणसं फक्त एका अफवेवर ...
रक्त लागत वाहु
तळमळतो किती जीव
करता दिनदहाडया कत्तल माणसांची
येत नसेल त्यांना कीव
रक्ताने माखवले जातात चेहरे
निष्पाप,निर्दोशांचे
दिनदहाडया कत्तल करतात
निरागस जिवांची नि
तोडतात लचके माणुसकीचे
म्हणुनच
ढासाळतो मानवतेचा परमोच्च शिखर
त्यामुळंच आता हात जोडतो
आण देतो माणुसकीची
की संपवु नका
माणसासारखी माणसंफक्त एका अफवेवर
