STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Abstract Classics

3  

Deepali Thete-Rao

Abstract Classics

पाहूणे

पाहूणे

1 min
140

सकाळी उठून नवऱ्याच्या हातात डबा देताना

ती आठवणीने सांगते सावकाश जा.. लवकर ये

मग धावपळ करून बाकीचं आवरते

आणि निघते ऑफिसला जायला

मनातला पसारा तसाच वागवत...


संध्याकाळी परतल्यावर 

तो घेऊन येतो बरोबर

 कामाचा शीण अन् व्याप...

 विसावतो जरा दमलो म्हणून

आणि कनेक्ट होतो जगातल्या घडामोडी जाणण्यासाठी..

त्याच्या आईचा हात फिरतो अलगद 

थकलेल्या लेकाच्या डोक्यावरून

अन् विचारतो मग तो ही लेकीला

अभ्यास.. सगळं बरं चाललंय ना म्हणून

आणि चाचपडतो घराचं कनेक्शन..


ती ची मात्र कामावरून बाहेर पडल्या पडल्याच रेंज जुळते घराशी.. 

तिचा सिग्नल कधीच नसतो 

आऊट ऑफ कव्हरेज एरिया..

परतल्यावर थकवा अलगद बाजूला करत 

ती सहजच कनेक्ट होते संसाराशी 

चालू घडामोडी जाणण्यासाठी.....


म्हणूनच म्हणते बयो...

घर फक्त 'ती'चच आहे

बाकी सगळे इथे पाहूणेच...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract